breaking-newsपुणे

#Lockdown:पुण्यात कन्टेन्मेंट झोन वगळून आयटी कंपन्या सुरु करण्यास परवानगी

पुणे : पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून आयटी कंपन्या सुरु करण्याची परवानगी उद्योग विभागाने दिली आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आयटी कंपन्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. काही अटी आणि शर्तीनुसार कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

पुणे महापालिका हद्दीत केवळ अत्यावश्यक सेवा असलेल्या उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणच्या आयटी कंपन्यांनाही परवानगी देण्यात आली.

पुणे शहरातील मगरपट्टा, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कोथरूड, चांदणी चौक, नांदेड सिटी, रामवाडी परिसर, डेक्कन, नळस्टॉप, पाषाण, बाणेरसह इतर विविध ठिकाणी आयटी कंपन्या आहेत.

काही अटी आणि शर्तीनुसार सोशल डिस्टन्सचे पालन करत कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पुणे शहरात साडे चारशे मोठे आणि 1400 लहान आयटी उद्योग आहेत. तर 72 आयटी पार्क असून या कंपन्यांमध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button