breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

LG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी

नवी दिल्ली – एलजीने मार्केटमध्ये आपले तीन नवीन स्मार्टफोन LG K62, LG K52 और LG K42 ला लाँच केले आहे. तिन्ही स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा फुल व्हिजन डिस्प्ले दिला आहे. कंपनीचे हे तीन स्मार्टफोन पुढील महिन्यात यूरोपमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर काही दिवसात भारतात मिळू शकतील.

LG K62चे वैशिष्ट्ये
फोनमध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा फोन ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येतो. अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 4000mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी यात चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनध्ये २८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

LG K52 चे वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.६ इंचाचा फुल व्हिजन एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये क्वॉड़ रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ५ मेगापिक्सलचा आणि दोन मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे.

LG K42 चे वैशिष्ट्ये
ग्रीन, ग्रे आणि रेड स्काय ब्लू कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये ३ जीबी रॅम सोबत ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ६४ जीबी स्टोरेजचे पर्याय मिळू शकतो. फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा कॅमेरा सोबत एक ५ मेगापिक्सलचा आणि दोन मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button