breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांना वैद्यकीय सुविधा जलदगतीने मिळाव्यात म्हणून रुग्णवाहिकेचे लोकार्पण

  • माजी महापाैर तथा विद्यमान नगरसेवक राहूल जाधव आणि मंगलताई जाधव यांचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी |महाईन्यूज|

जाधववाडी, चिखली प्रभागातील वाढत्या शहरीकरणामुळे मुलभूत नागरी सुविधांवर ताण येत आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना वैद्यकीय सुविधांची गरज पुर्ण करण्यासाठी माजी महापाैर तथा विद्यमान नगरसेवक राहूल जाधव आणि मंगलताई जाधव यांच्या प्रयत्नातून दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेमुळे परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा जलदगतीने मिळवून त्यांना जीवदान मिळणार आहे.

या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रास्ताविकात नगरसेवक राहुल जाधव म्हणाले की, भोसरीचे आमदार महेशदादांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा विकास झपाट्याने होत आहे. जाधववाडी, चिखली परिसरात नागरीकरण वाढत असताना गृहप्रकल्पांत वास्तव्यास आलेल्या रहिवाशांना अनेक मुलभूत सुविधासाठी संघर्ष करावा लागत आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी रहिवाशांना  कराराप्रमाणे मुलभूत सुविधा देणे अपेक्षित होते. परंतु, मुलभूत सुविधा दिलेल्या नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. तसेच रस्ते, पाणी, आरोग्य, पथदिवे, क्रिडागंणे आदी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय सर्वांना मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, शहरातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता पायाभूत मुलभूत सुविधावरती ताण येत आहे. रहिवाशांना पाण्याची खूप समस्या जाणवत आहे. येत्या काही दिवसात भामा-आसखेडचे पाणी या भागातील नागरिकांना मिळेल. तसेच वाघोली पाणी पुरवठा योजना ताब्यात घेऊन नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोरोना काळात राहुलदादा आणी मंगलताई यांनी सुरु केलेल्या या उपक्रमामुळे गोरगरीब रुग्णांना लवकर वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होईल. यापुढे सर्वांनी आपआपली काळजी घेवून मास्काचा वापर करावा, असेही लांडगे यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व नागरिक मास्क घालून कोरोना नियमांचे पालन करुन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

‘या’ सोसायटीतील नागरिकांना मिळेल लाभ

जाधववाडी, चिखली परिसरातील ऐश्वर्यंम हमारा, रिवर रेसीडेन्सी, वास्तू ड्रिम, मिलिनियम पँरामाउट, ऐश्वर्यंम हमारा म्हाडा, क्रिस्टल, सीटी रामकृष्ण हरी, स्वस्तिक स्पिरा, कोलुसुस ग्रीन सीटी, अक्षा वृंदावन, अक्षा अँम्पयर, भूमी सिलिरिओ, वैष्णवी, गायत्री लेन्स, जी.के. कनवर, आकाश वेद, अध्याराध विष्णू विहार, विष्णू ग्रीन एवरेस्ट, प्लाझा लवनेस्ट आदी. सोसायटीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button