breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी

पुणे ( महा ई न्यूज ) –  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या राज्यभर मराठा क्रांती मोर्चा कडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे बंदच देखील आवाहन करण्यात आहे. त्यामुळे बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा महाविद्यालय बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत.

9 अॉगस्ट 2018 रोजी मराठा क्रांती मोर्चा यांनी राज्यव्यापी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने शाळा व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्राथमिक माध्यमिक व मनपा खाजगी व्यवस्थापन सर्व माध्यमिक शाळांना सुट्टी देण्यात यावी तसे सदरची सुट्टी ही स्थानिक सुट्टी म्हणून ग्राह्य धरण्यात यावी असे निवेदन दिपक माळी शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण पुणे महानगरपालिका आणि शिवाजी दौंडकर प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका यांनी काढलं आहे .

तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डिकर यांनीही शहरासह महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा पुर्णपणे बंद राहणार असल्याचे प्रसिध्द पत्रकांद्वारे कळविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button