breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘सलमान खानचा अहंकार मोडणार’; लॉरेन्स बिश्नोईची उघड उघड धमकी

माझ्या समाजातील लोकांचा सलमान खानवर खूप राग आहे

पंजाबचा गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. याबरोबरच त्याने अनेक गोष्टींचा अलगडा केला आहे.

मी गँगस्टर होईल, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. मी चंदीगड विद्यापीठात कायद्याचा विद्यार्थी होतो. मला परिस्थितीने गंड बनवलं. महाविद्यालयीन काळात मी राजकारणातही सक्रीय होतो. त्यावेळी विरोधीगटातील विद्यार्थ्यांशी झालेल्या भांडणानंतर मला आणि माझ्या काही सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून मी तुरूंगातच आहे. मला या तुरूंगानेच गँगस्टर बनवलं, असं लँरेन्स बिश्नोई म्हणाला.

तुरूंगात काही गुंडांनी आमच्या काही सहकाऱ्यांची हत्या केली. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला शस्त्र उचलावी. सहकाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्हाला चुकीच्या मार्गावर जावं लागलं. आम्ही समाजात कोणतीही दहशत पसरवत नाही. आम्ही फक्त आमच्या सहकाऱ्यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून करतो. सिंद्धू मुसेवालाच्या हत्येमागेही हेच कारण होतं, कारण त्याने आमच्या सहकाऱ्यांना मारणाऱ्यांना मदत केली होती, असं बिश्नोई म्हणाला.

माझ्या समाजातील लोकांचा सलमान खानवर खूप राग आहे. त्याने कायम आमच्या समाजाला तुच्छ लेखलं. त्याच्यावर केस चालू आहे. पण, अद्यापही माफी मागितली नाही. आमच्या परिसरात प्राण्याचा जीव घेतला जात नाही. झाडं कापण्यास बंदी आहे. मात्र, जिथे बिश्नोई समाजाची संख्या जास्त आहे, तिथे येत सलमान खानने हरीणाची शिकार केली आहे.

माझा सलमान खानवर लहानपासून राग आहे. कधी ना कधी सलमान खानचा अहंकार मोडणार आहे. त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन माफी मागितली पाहिजे. सलमान खानने बिश्नोई समाजातील लोकांना पैशांचं आमिष दाखवलं होतं. परंतु, सलमान खानला प्रसिद्धीसाठी नाहीतर हेतूच्या उद्धेशाने मारणार आहोत. मी कोणतीही धमकीची चिठ्ठी लिहली नाही. सलमानला आम्ही ठोस उत्तर देणार आहे. पण, बिश्नोई समाजाने सलमान खानला माफ केलं, तर आमचं काही देणं-घेणं नाही, असं बिश्नोई म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button