breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाकचे विरोधी पक्षनेते शहाबाज यांना ‘मनी लाँड्रिंग’प्रकरणी अटक

लाहोर – पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते, पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज) अध्यक्ष शहाबाज शरीफ यांना सोमवारी अटक करण्यात आली. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे ते बंधू आहेत. देशात गेल्याच आठवड्यात विरोधकांनी पंतप्रधान इम्रान खानविरोधात देशव्यापी निदर्शने केली होती. सरकारने तेव्हाच शहाबाज यांच्या विरोधात ‘मनी लाँड्रिंग’प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

शहाबाज (वय ६९) २००८ ते २०१८ या काळात पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. ते आणि त्यांची मुले हमजा आणि सलमान यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप शहजाद अकबर यांनी केला आहे. त्यांच्या खात्यात १७७ व्यवहारांचा हिशेब लागत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अकबर हे पंतप्रधानांचे सल्लागार आहेत. दरम्यान, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी या अटकेचा निषेध केला आहे. विरोधकांनी उघडलेल्या आघाडीमुळे पंतप्रधान इम्रान खान घाबरले असून त्यांनी विरोधकांची मुस्कटदाबी सुरू केली आहे. कदाचित हे अटकसत्र अजूनही सुरूच राहील, असे त्यांनी म्हटले आहे. खोट्या प्रकरणात अडकवून पाकिस्तानमधील विरोधी पक्षांना संपवण्याचा कट इम्रान खान यांनी आखला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

शहाबाजच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पीएमएल-एनच्या प्रवक्त्या मरियम नवाज म्हणाल्या की, शहबाज यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू नवाझ शरीफ यांना आपला पाठिंबा कायम ठेवत त्यांची कठीण काळात साथ सोडली नाही. त्यामुळेच शहाबाज यांना गोवण्यात आले असल्याचा आरोप मरियम यांनी केला. इम्रान खान यांचे सरकार सूडाची कारवाई करून आमच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button