breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘मेकअप’ या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सेटवर भिंत कोसळल्यामुळे चिन्मयला दुखापत…

‘मेकअप’ या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू राजगुरु पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एवढचं नाही तर,अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि रिंकू राजगुरू यांची जोडीही पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक अपघात घडला आणि त्यात चिन्मयला दुखापत झाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चिन्मयने याबद्दल सांगितले.

“आम्ही एक मोंटाज शूट करत होतो. तो मोंटाज बघण्यासाठी आम्ही मॉनिटर जवळ गेलो. तिथे एक भिंत आणि खांब होता. त्याला एका कमानीचा लूक दिला होता. मोंटाज बघताना मी त्या भिंतीला टेकून उभा होतो, अचानक ती भिंत कोसळली. त्यात मला आणि गणेश दादाला लागले. मला लागले आहे हे माझ्या लक्षात आले. मात्र गणेश दादाकडे लक्ष असल्यामुळे मी ही बाब एवढ्या गांभीर्याने घेतली नाही. थोड्या वेळाने माझ्या डोक्यातून रक्त येत असल्याचे मला कळले. सेटवरच्या लोकांनी आम्हा दोघांना दवाखान्यात नेले. माझ्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली,” असेही त्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button