Breaking-newsताज्या घडामोडी

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता मोदी सरकारची विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्यावर भर!

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या 'संकल्प ते सिद्धी' अभियानांतर्गत कार्यशाळा

पिंपरी-चिंचवड | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने देशभरात ‘संकल्प ते सिद्धी’ हे अभियान सुरू केले आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, या अभियानाचाच एक भाग म्हणून, पिंपरी-चिंचवड शहरात बुधवार, ११ जून २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गोविंद गार्डन बॅंक्वेट हॉल, पिंपळे सौदागर, येथे जिल्हा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, ‘संकल्प ते सिद्धी’ अभियान हे केंद्र सरकारच्या विविध विकास योजना आणि कामगिरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ४ कोटी लोकांना पक्की घरे, ‘हर घर जल’ योजना, आयुष्मान भारत योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. तसेच, २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सहभागी करून घेणे, हे देखील या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सरकारच्या कामगिरीची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवणे हे देखील या कार्यशाळेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

या कार्यशाळेला प्रदेश महामंत्री राजेश पांडे आणि जिल्हा प्रवासी ऍड. वर्षा डहाळे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. आगामी सर्व कार्यक्रमांच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

हेही वाचा    :    पीओपी गणेशमूर्तीवरील बंदी उठवली; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, पण ‘ही’ अट कायम 

कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्ट्ये:

जनजागृती: मोदी सरकारने केलेल्या कामाची आणि योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे.

विकसित भारताचे स्वप्न: २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

लाभार्थी नोंदणी: आयुष्मान भारतसारख्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शिबिरे आयोजित करणे.

सामाजिक बांधिलकी: ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयानुरूप समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवणे.

या अभियानांतर्गत जिल्हास्तरावर प्रदर्शने, संवाद सत्रे, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. याव्यतिरिक्त, ५ जून रोजी ‘एक वृक्ष मातृभूमीसाठी’ हे विशेष अभियान सुरू करण्यात आले असून, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर १७ ते २० जून दरम्यान योग सत्रांची मालिका आयोजित केली जाईल. तसेच, २५ जून १९७५ रोजी लादण्यात आलेल्या आणीबाणीस स्मरून देशभरात जनजागृती कार्यक्रम घेण्यात येतील. या कार्यक्रमाद्वारे भाजप लोकांना सरकारच्या कामगिरीबद्दल माहिती देऊन त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button