Apple iPhone ची एक्सपायरी डेट काय? किती वर्ष चालतो iPhone? जाणून घ्या..

Apple iPhone | Apple iPhone हे सर्वात प्रीमियम स्मार्टफोन असून लूक आणि डिझाइनसोबतच, हे फोन फीचर्सच्या बाबतीतही सर्वोत्तम मानले जातात. जेव्हा आपण आयफोन खरेदी करायला जातो तेव्हा आपण त्याच्या कॅमेरा, डिस्प्ले, प्रोसेसर यासारख्या फीचर्सकडे जास्त लक्ष देतो. पण प्रत्येक फोन आणि आयफोनची एक निश्चित एक्सपायरी डेट असते. या एक्सपायरी डेटनंतर त्यांचा वापर केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात.
कोणत्याही आयफोनचे सरासरी आयुष्य सुमारे ४-५ वर्षे असते. याचे एक मोठे कारण म्हणजे कंपनी त्यांच्या नवीन आयफोनवर सुमारे ५ वर्षे सॉफ्टवेअर अपडेट्स देत असते. कंपनी जुन्या स्मार्टफोनसाठी त्यांचे नवीन iOS व्हर्जन आणत नाही. ज्यामुळे त्या स्मार्टफोनची प्रोसेसिंग पॉवर म्हणजेच कार्य क्षमता कमी होऊ लागते. एवढेच नाही तर जर तुमच्या आयफोनची एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर तुमचा पर्सनल डेटा देखील खराब होऊ शकतो.
हेही वाचा : रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजेंची हकालपट्टी करा; लक्ष्मण हाकेंची मागणी
जोपर्यंत आयफोनला ओएस अपडेट मिळतात तोपर्यंत त्याची एक्सपायरी डेट किंवा एक्सपायरी वर्ष सारखेच असते. कंपनी कोणत्याही आयफोनमध्ये लेटेस्ट फीचर्स फक्त ४-५ वर्षांसाठी आणते आणि अपडेट्सद्वारे फोनमधील बग दूर करते. पण जेव्हा iOS व्हर्जन जुनी होते आणि सिक्योरिटी अपडेट उपलब्ध नसतात तेव्हा फोनवर हॅकिंग आणि सायबर हल्ल्याचा धोका देखील वाढतो.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा