Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार लक्ष्मणभाऊ चषक भव्य क्रिकेट स्पर्धा

पिंपरी : लोकनेते स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त आमदार लक्ष्मणभाऊ चषक भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आमदार लक्ष्मणभाऊ चषक भव्य क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि शिस्तप्रिय वातावरणात हजारो क्रिकेट रसिक प्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाली. या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्री.मुरलीधर अण्णा मोहोळ आणि विधानपरिषदेचे सन्माननीय सभापती मा.श्री.राम शिंदेजी, आमदार शंकरभाऊ जगताप, उद्योजक विजय जगताप, चिंचवड विधानसभा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

०७ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान दिवस रात्र सुरु असलेल्या स्पर्धेत पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ३२ संघ, पुणे जिल्हा १६ संघ आणि एक आमदार एक संघ अंतर्गत १६ संघ तसेच सांगवी दापोडी पिंपळे गुरव या भागातील २० स्थानिक संघ अशा एकूण ८४ संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाशैलीने प्रदर्शन करत हि स्पर्धा अत्यंत रोमांचक बनवली.

बक्षीस समारंभ कार्यक्रमास विजेत्या संघाला रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आणि पराभूत संघाला अपयशाने खचून न जाता पुढील कारकिर्दीसाठी नव्या जोमाने पुन्हा तयारी करावी या शुभेच्छा दिल्या.तसेच या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल श्री.अजय दुधभाते, श्री.मनीष कुलकर्णी, श्री.निलेश जगताप आणि श्री.प्रवीण वाघमोडे यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा –  ‘पुणेकरांना मुळशी धरणातून पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच मार्ग निघेल’; मंत्री चंद्रकांत पाटील

यावेळी आमदार श्री.अमित गोरखे, भाजपा मावळचे अध्यक्ष श्री.रवींद्र भेगडे, प्रसिद्ध उद्योजक, गोसेवक श्री.विजय जगताप, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.विलास मडीगेरी, मा.महापौर सौ.माई ढोरे, श्री. श्रीनाथ भिमाले, मा.उपमहापौर श्री.सचिन चिंचवडे, श्री.अजिंक्यदादा राम शिंदे, मा.नगरसेवक श्री.सागर आंगोळकर, श्री.संतोष कांबळे, मा.स्वीकृत सदस्य श्री.महेश जगताप, श्री गणेश सहकारी बँकेचे मा.अध्यक्ष संजय जगताप मा.सभापती शिक्षण मंडळ श्री.चेतन घुले, उद्योजक श्री.कपिल कुंजीर, श्री.नवनाथ ढवळे यांसह सर्व संघांचे संघमालक, खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते.

PATCA अंतर्गत विजयी संघ

प्रथम क्रमांक : अमर भाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन ( आधी श्री इलेव्हन)

द्वितीय क्रमांक :रायझिंग स्टार भोसरी

तृतीय क्रमांक :सह्याद्री योद्धा दिघी

चतुर्थ क्रमांक :संडे क्रिकेट क्लब कासरवाडी

सांगवी पिंपळे गुरव दोपोडी प्रीमियर लीग विजयी संघ

प्रथम क्रमांक : MNC

द्वितीय क्रमांक : सक्सेस ग्रुप

तृतीय क्रमांक : संदीप दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन

चतुर्थ क्रमांक : राहुल जवळकर स्पोर्टस फाउंडेशन

पाचवा क्रमांक : संजय कणसे ब्रिलियंट बॉईज

खुल्या गटातून या स्पर्धेतील विजयी संघ –

प्रथम क्रमांक : कोथरूड स्ट्रायकर कोथरूड

द्वितीय क्रमांक : मातोश्री 11 हडपसर

तृतीय क्रमांक : श्री विठ्ठल नाना काटे स्पोर्ट्स फाउंडेशन खेड

चतुर्थ क्रमांक : आलम भाई पठाण क्रिकेट क्लब खडकवासला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button