आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

ट्रम्प – मस्क विरोधात अमेरिकेत निदर्शने

‘हॅण्ड्स ऑफ’ रॅली निघाल्या, रस्त्यांवर उतरले हजारो लोक

अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात शनिवारी देशभरात रॅली निघाल्या. टॅरिफचे धोरण, कर्मचाऱ्यांची कपात, अर्थव्यवस्था, मानवाधिकार आणि अन्य मु्द्यांवर ट्रम्प सरकारचा निषेध करणाऱ्या या रॅलीजने अमेरिकेतील विरोध समोर आला आहे. सर्व ५० राज्यासह शेजारील देश कॅनडा आणि मॅक्सिकोत देखील निदर्शने करण्यात आली आहेत.

कॅनडा आणि मॅक्सिकोतही निदर्शने
अमेरिकेच्या सर्व ५० राज्यांसह शेजारील कॅनडा आणि मॅक्सिकोत देखील प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १५० कार्यकर्त्यांच्या गटांनी या निदर्शनात सहभाग घेतला. ज्यात वॉशिग्टन डीसी आणि राष्ट्राध्यक्षांच्या फ्लोरिडा येथील निवासस्थानाजवळ देखील काही निदर्शक जमले होते. हॅण्ड्स ऑफचा नारा लावीत लोकांनी ट्रम्प आणि सरकारी दक्षता विभागाचे (DOGE) संचालक इलॉन मस्क यांच्या विरोधात देखील निदर्शने केली आहेत.

‘हॅड्स ऑफ’ चा अर्थ काय ?
‘हॅड्स ऑफ’चा अर्थ ‘आमच्या अधिकारांपासून दूर रहा’ या घोषणांचा अर्थ निदर्शकांना त्यांच्या अधिकारांवर कोणा अन्य लोकांचा नियंत्रण नको आहे.ट्रम्प प्रशासन आणि DOGEच्या टीकाकारांनी बजेट कपात आणि कर्मचाऱ्यांची कपात संघीय सरकारचा आकार कमी करण्याच्या प्रयत्नांविरोधात निदर्शने आयोजित केली होती.

1,200 हून अधिक निदर्शने
150 हून अधिक गटांनी शनिवारी अमेरिका आणि शेजारील देशात एकूण 1,200 हून अधिक निदर्शने आयोजित केली होती.या निदर्शनांना ‘हॅड्स ऑफ’ असे नाव ठेवले होते,त्यात नागरिक अधिकारी संघटना, श्रमिक संघटना, एलजीबीटीक्यू+ समर्थक,माजी सैनिक आणि निवडणूक कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.ट्रम्प यांच्या धोरणाचा या वेळी निदर्शकांनी जोरदार निषेध केला आहे. एका निदर्शकाने सांगितले की मी महात्मा गांधींमुळे प्रेरित झालेलो आहे. आम्ही येथे का आलो तर आमचा महासागर आणि आमचं मीठ आहे. जोपर्यंत वर्ल्ड कॉमर्स आणि वर्ल्ड एक्सचेंजचा प्रश्न आहे.आमच्या जवळ एकमेकांना देण्यासाठी खूप काही आहे असेही या निदर्शकाने म्हटले आहे.

हेही वाचा –  ‘संजय राऊतांनी सामनातून काँग्रेसचे विचार मांडायला सुरुवात केलीय’; मंत्री योगेश कदम यांचा टोला

ट्रम्प गुन्हेगार म्हणून ओळखले जातील
मी दोन वर्षांपूर्वी कोलकात्यात राहत होतो आणि या शहरात देवी काली माता राहते.वॉशिंग्टन स्मारकाजवळ आपण सर्वजण आज निदर्शने करीत आहोत की हे सहन केले जाणार नाही आणि इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प पुढच्या इतिहासात गुन्हेगार म्हणून ओळखले जातील. या लोकांना सत्तेतून बाहेर काढायला हवे असे एका निदर्शकाने म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे एक कठपुतली आहेत
मी येथे या सर्व लोकांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, जे त्यांच्या नोकऱ्या, आरोग्य विमा, वैद्यकीय सेवा, सामाजिक सुरक्षा, घर, अन्न यासाठी लढत आहेत. पैशांअभावी लोकांचे हाल होत आहेत. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत असे एक निदर्शक म्हणाला. आमचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे एक कठपुतली आहेत आणि टॅरिफ हे आमच्या देशाला उद्ध्वस्त करण्याचे एक साधन आहे. आपण सर्वजण इथे जमले आहोत कारण देशात सुरू असलेल्या टॅरिफ आणि मंदीमुळे आपण खूप त्रस्त आहोत असे अन्य एका निदर्शकाने आपली बाजू मांडताना सांगितले.

ट्रम्प यांचे ध्येय हुकूमशहा बनणे
ट्रम्प यांनी प्रचंड वाढवलेले टॅरिफ हे अमेरिकन आणि जगभरातील लोकांना आपण एक विध्वंसक शक्ती आहोत याचा इशारा देण्यासाठी केलेली एक चाल आहे. त्यांचे ध्येय हुकूमशहा बनण्याचे आहे, त्यांची धोरणे अमेरिकन लोकांसाठी चांगली नाहीत, ती आपल्या सहकारी देशांसाठी, व्यापारी भागीदारांसाठी आणि भारतासारख्या मोठ्या लोकशाही आणि विकसनशील जगातील लोकांसाठी चांगली नाहीत असे दुसऱ्या एका निदर्शकाने म्हटले.

आपण त्यांच्यासोबत एक भागीदार म्हणून काम केले पाहिजे आणि अशाप्रकारे टॅरिफ लादू नये ज्यामुळे अमेरिकन लोक गरीब होतील आणि भारताची लोकही गरीब होतील. मला आशा आहे की पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संपर्क साधतील आणि त्यांना समजावून सांगतील की हे शुल्क अमेरिकन, भारतीय आणि जगातील लोकांसाठी वाईट आहे असे एक निदर्शक म्हणाला.

जगभरातील देशांवर कर लादण्याची घोषणा
या आठवड्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निर्यातीवर जशास तसे व्यापारी शुल्क लावण्याचे जाहीर केल्यानंतर अमेरिकेत ही निदर्शने सुरू झाली आहेत. ज्यामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठेत खळबळ उडाली आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली. २ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर मोठ्या प्रमाणात शुल्क लादण्याची घोषणा केली. फेब्रुवारीमध्ये, दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच, ट्रम्प यांनी एक नवीन व्यापार धोरण जाहीर केले. अमेरिका इतर देशांनी अमेरिकन वस्तूंवर ज्याप्रमाणात शुल्क लावलेय तसेच शुल्क त्यांच्यावर लादेल असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button