ताज्या घडामोडी
टाकी साफ करत असताना गुदमरून पाच मंजुरांचा मृत्यू
प्रकृती खालावल्याने या पाचही मजुरांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल

मुंबई : मुंबईत नागपाडा येथे पाण्याची टाकी साफ करताना एक दुर्घटना घडली आहे. टाकी साफ करत असताना गुदमरून पाच मंजुरांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा – शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू
नागपाडा येथे असलेल्या एका खासगी विकासकाच्या इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली. या इमारतीचे काम सध्या सुरू आहे. या इमारतीत असलेल्या पाण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी पाच मजूर आज दुपारी त्यात उतरले होते. त्यानंतर त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती खालावल्याने या पाचही मजुरांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या पाचही मंजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.