Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

बकरी ईदसाठी योगी सरकारचे कडक आदेश; रस्त्यांवर नमाज पठण आणि सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास सक्त बंदी

Yogi Adityanath | आगामी बकरी ईदचा सण शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून साजरा व्हावा, यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. “बकरी ईदच्या काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास पूर्णपणे बंदी असेल. तसेच, कोणत्याही परिस्थितीत रस्ते अडवून नमाज पठण करता येणार नाही,” असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारी आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेताना त्यांनी हे आदेश दिले. या बैठकीत केवळ सण-उत्सवांची तयारीच नाही, तर जनतेच्या तक्रारींचे निवारण, गंगा दसरा आणि बेकायदेशीर कामांविरोधातील कारवाई अशा अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

‘झिरो टॉलरन्स’ अंतर्गत कठोर कारवाई

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की, कायदा हातात घेणाऱ्यांवर आणि बंदी असलेल्या प्राण्यांची कुर्बानी देणाऱ्यांवर ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहनशीलता) धोरणांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. जिल्हा प्रशासनाने केवळ आधीपासून निश्चित केलेल्या ठिकाणीच कुर्बानी देण्याची परवानगी द्यावी, तसेच कोणत्याही नवीन परंपरेला किंवा पद्धतीला परवानगी दिली जाणार नाही. नमाज पठण केवळ पारंपरिक आणि निश्चित केलेल्या धार्मिक स्थळांवरच केले जावे. रस्त्यांवर रहदारी रोखून नमाज पठण करण्यास सक्त मनाई असेल, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे.

हेही वाचा

IPL 2026 : प्लेऑफचे ‘टॉप ४’ संघ ठरले! राजस्थान रॉयल्सची शेवटच्या क्षणी धडक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

नागरिकांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना

सण साजरा करताना सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत:

स्वच्छता आणि मांस विक्रीवर नियंत्रण

कुर्बानीनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची आणि प्राण्यांच्या अवशेषांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली पाहिजे, जेणेकरून परिसरात दुर्गंधी पसरणार नाही. यासोबतच उघड्यावर मांस विक्री करण्यास सक्त मनाई असेल आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कडक कारवाई केली जाईल. अधिकृत कत्तलखान्यांमध्येही क्षमतेपेक्षा जास्त प्राणी ठेवता येणार नाहीत, याची काळजी घेण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे.

गस्त वाढवणे आणि पायाभूत सुविधा

राज्यातील संवेदनशील भागांत पोलीस प्रशासनाने तात्काळ ‘फ्लॅग मार्च’ सुरू करावा. धार्मिक स्थळांच्या परिसरात पायी गस्त वाढवण्यात यावी. तसेच सणाच्या काळात जनतेला त्रास होऊ नये म्हणून वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

संवेदनशील जिल्ह्यांवर विशेष लक्ष

अलिगड, बिजनोर, सहारनपूर, रामपूर आणि संभल या संवेदनशील जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी जुन्या घटनांचा अभ्यास करून संभाव्य समाजकंटकांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावरील अफवांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेललाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button