ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

देशभक्तीपर नृत्य, विविध भाषणे आणि शिस्तबद्ध संचलनाने रंगला स्वातंत्र्य दिन सोहळा; विद्यार्थ्यांना लाडू वाटप

पिंपरी-चिंचवड : न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन आणि मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे स्वातंत्र्य दिन सोहळ्याला विशेष रंगत आली.

कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, संस्थेचे अध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष निलेश पलघोमल, सचिव अशोक मोरे, खजिनदार सुरेखा पवार, सदस्य विलास शेलार, रमेश पाटील, विनायक पवार, रणजीत माने, नयना माने, महादेव जमादार, मुख्याध्यापिका विद्या मॅडम, नायगम अग्नी मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर भाषणेही सादर केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले संचलन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी झाले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्त आणि देशभक्तीची भावना पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पवार यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची आणि संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांना देत त्यांच्या मनामध्ये देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्याचे आवाहन केले.

स्थायी समिती सभापतींचे आवाहन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनीही विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशाच्या विकासात योगदान देण्याची जिद्द आणि जबाबदारी मनात ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना लाडू व खाऊचे वाटप करून करण्यात आली. देशभक्ती, शिस्त आणि उत्साहाने न्हाऊन निघालेला हा स्वातंत्र्य दिन सोहळा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button