ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

SPG इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

देशभक्तीपर वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण; ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव

पिंपरी-चिंचवड : एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण, देशभक्तीमय आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्तबद्ध परेड, नृत्य सादरीकरण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सागर बाळासाहेब गवळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पांडुरंग नाना गवळी आणि सुनीता पांडुरंग नाना गवळी यांनी भूषविले. स्वप्नील पांडुरंग गवळी, कोमल स्वप्नील गवळी आणि संकल्प पांडुरंग गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्कूलचे प्राचार्य प्रवीण गायकवाड, सुप्रिया मुळे आणि तैसीन मुलाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कॉलेजचे व्यवस्थापन, रेहान सर, जयश्री सुरवसे, वैशाली यादव आणि कॉलेजमधील सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

इयत्ता पाचवी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, परेड आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. रुपाली ससाणे, विकी सर, प्रेमलता मॅडम आणि भावना मॅडम यांनी विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करून घेतली. कॉलेजच्या प्राचार्या वैशाली यादव यांनी केलेले प्रेरणादायी भाषण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरले. मनीषा चव्हाण आणि अश्विनी मांजरेकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उत्कृष्ट निकालासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या मेहनतीचे, मार्गदर्शनाचे आणि समर्पणाचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

शिस्तबद्ध परेडने वेधले लक्ष

विकी सर आणि सोहम सर यांच्या नियोजनातून विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध परेड साकारण्यात आली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि देशभक्तीच्या भावनेने सादर केलेल्या परेडला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आकर्षक सजावटही विशेष लक्षवेधी ठरली. सजावटीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. विशेषतः एकता जाधव आणि निशा वाघमारे यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कॉलेजचे शिक्षक, व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांमुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला, अशी माहिती तैसीन मुलाणी यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button