एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात
शिक्षण विश्व: गुरुशिष्य परंपरेचे जतन करत विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान

पिंपरी | गुरुशिष्य परंपरेला साजेशा भक्तिभावाने व श्रद्धेने एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, भोसरी येथे १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. पांडुरंग नाना गवळी आणि सुनीता माई गवळी यांनी भूषवले. यावेळी शाळेचे संचालक श्री. नितीन लोणारी, मुख्याध्यापक डॉ. प्रवीण गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. नेहा खांडेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मुख्याध्यापक डॉ. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या भाषणात गुरुपौर्णिमेचे महत्त्व उलगडून सांगितले. “गुरुजन हेच जीवनात प्रकाश देणारे दीपस्तंभ असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होते,” असे ते म्हणाले.
हेही वाचा : पार्सल पाठवायचे आहे? चिंचवड पोस्ट ऑफिस मध्ये “वन स्टॉप सोल्युशन”!

विद्यार्थ्यांनी या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गुरुशिष्य नात्याचे महत्व सांगणारे नाट्य, भक्तिगीते आणि मनोवेधक सादरीकरणातून त्यांनी आपले गुरूंप्रती आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी गुरुजनांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू देत त्यांचा सन्मान केला.
..हीच खरी गुरूदक्षिणा!
गुरुजनांनी विद्यार्थ्यांना सद्वर्तन, नम्रता व शिस्त याबाबत मार्गदर्शन केले. “गुरुंच्या शिकवणीचे आचरणात पालन करणे, हाच खरी गुरुदक्षिणा आहे,” असा सल्ला त्यांनी दिला.हा कार्यक्रम गुरु-शिष्य परंपरेचे जतन करणारा, विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची पेरणी करणारा आणि भावनिकदृष्ट्या प्रत्येकासाठी संस्मरणीय ठरला. सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकवर्गाने या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.




