Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहारमधील सारण जिल्ह्यात 24 तासांत विषारी दारू पिऊन आत्तापर्यंत 21 जणांचा मृत्यू

। पटना । महाईन्यूज। वृत्तसंस्था ।

बिहारमध्ये पुन्हा एकदा विषारी बनावट दारूचा कहर पाहायला मिळत आहे. सारण जिल्ह्यात 24 तासांत विषारी दारू पिऊन आत्तापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मसरखमध्ये सर्वाधिक म्हणजे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अर्धा डझनहून अधिक जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अनेकांच्या दृष्टीवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. मृतांचे नातेवाईक आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे सांगत आहेत.
या घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती आलेली नाही. या घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी संतोष कुमार म्हणाले. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मशरख हनुमान चौक स्टेट हायवे 90 वर मृतदेह ठेवून रोखून धरला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेनंतर नागरिकांचा आक्रोश पाहता पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

इसुआपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील डोईला येथे अमनौर, मधौरा आणि मसरख ब्लॉकमधील 14 लोकांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाला, तर इतर सहा जण गंभीर आजारी आहेत. सर्व आजारी लोकांना मसरख आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तेथून एका व्यक्तीला छपरा सदर रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. त्याच्यावर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी सर्वांनी एकाच ठिकाणी दारू प्यायल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मंगळवारपासून त्यांची प्रकृती ढासळू लागली. सर्वांना सायंकाळी मसरख आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button