स्मृती मांधना, हरमनप्रीत कौर यांची आक्रमक फलंदाजी, भारताकडून वेस्ट इंडीजला 318 धावांचं लक्ष्य
हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्कवर सुरु झालेल्या महिला विश्वचषक स्पर्षेत आज भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज आमनेसामने खेळणार आहेत. यात भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीज संघासमोर 318 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारताची सलामीवीर स्मृती मांधना आणि हरमनप्रीत कौरनं वेस्ट इंडीजच्या आक्रमक फलंदाजी केली. ज्यामुळं भारताला वेस्ट इंडीजच्या संघासमोर विशाल लक्ष्य ठेवता आलं आहे. वेस्ट इंडीजचा संघ आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यामुळं आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी बजावतात? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
महिला विश्वचषकमधील भारतीय संघाचा हा तिसरा सामना आहे. याआधी झालेल्या दोन सामन्यामध्ये एकात भारतानं विजय मिळवला आहे तर दुसऱ्या सामन्यात भारताला पराजयाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात न्युझीलंडचा पराभव झाला होता





