Raksha Bandhan | बहिणींनो भावाला राखी बांधताना फक्त ३ गाठी बांधा? जाणून घ्या महत्त्व..
Raksha Bandhan 2024 | आज रक्षाबंधन, भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण आहे. हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. यामुळे बहीण भावाचं नात मजबूत होतं आणि भावाच्या दीर्घयुष्यासाठी बहीण प्रार्थना करते. ज्योतीषशास्त्रात राखी बांधताना काही नियम सांगण्यात आले आहेत.
राखी बांधताना बहिणीचे तोंड हे उत्तरेच्या दिशेने असावे तर भावाचे तोंड हे पूर्वेकडे असावे. धार्मिक मान्यतेनुसार, राखीमध्ये ३ गाठी बांधणे खूप शुभ असते. या ३ गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे राखी बांधताना पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ स्वत:च्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम आणि गोडवा आणण्यासाठी असते.
हेही वाचा – ..तर या देशात लोकशाही आहे कुठं? संजय राऊत यांचा सवाल
तसेच रक्षाबंधनाला तयार केलेल्या ताटात रोळी, अक्षत, हळद, नारळ, राखी, दिवा, मावा किंवा खीर इत्यादी पदार्थ असणं खूप महत्त्वाचं आहे.
राखी पौर्णिमा तिथी :
मराठी पंचांगानुसार राखी पौर्णिमा तिथी श्रावणातील तिसरा सोमवार १९ ऑगस्ट २०२४ ला पहाटे ३.०४ ते रात्री ११.५५ वाजेपर्यंत आहे.
(टीप- या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही.)