धक्कादायक! शालेय पोषण आहार खाल्ल्याने काही विद्यार्थ्यांना त्रास
सहा विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाब झाल्याचे समोर

कोल्हापुर : शाळेत पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या घटना अनेक वेळा समोर आल्या आहे. यात अनेक मुलांना त्रास झाला आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना कोल्हापूरातून समोर आली आहे. शालेय पोषण आहार खाल्ल्याने काही विद्यार्थ्यांना त्रास झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शालेय पोषण आहार खाल्ल्याने विद्यार्थिनींना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होण्यास सुरूवात झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील माळवाडी इथल्या विद्यामंदिर माळवाडी प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेतील विद्यार्थिनींना कोतोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत सहा विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाब झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे. दररोज शालेय पोषण आहारातून दगड, अळ्या आणि निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा पालकांनी आरोप केला आहे. यामुळे नागरिक प्रशासनावर टीका करत आहेत.
हेही वाचा – महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीत फडकला… ई साहित्याला राष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार
ही घटना घडल्यानंतर पालकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यानंतर शिक्षक आणि शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तुम्ही विद्यार्थ्यांना शिळे जेवण देता का? तसेच पोषण आहारात करपलेला भात देता? भातात अळ्या आणि टोके मिळतात. तर तुम्ही काय करता? असा आक्रमक सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे.
यावर शाळेच्या व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष के पी खोत यांनी या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे सांगितले. तसेच शालेय पोषण आहार आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.