Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचा दारुण पराभव ; ‘नोटा’पेक्षाही कमी मते

पणजी । प्रतिनिधी
गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.  या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत. नोटाला 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे.

दरम्यान, गोव्यातील निवडणूक निकालाचा परिणाम  महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल, असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button