एस. पी. जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची कराटेत चमकदार कामगिरी
मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या बळावर नव्या, उत्कर्ष आणि स्वरा यांचे कराटेत यश

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
एस. पी. जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, भोसरी येथील विद्यार्थ्यांनी कराटे क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत शाळेचा आणि संस्थेचा मान उंचावला आहे. शाळेतील नव्या बागुल (इयत्ता ३ री), उत्कर्ष उबाळे (इयत्ता ६वी) आणि स्वरा पानसरे (इयत्ता ७वी) या विद्यार्थ्यांनी अलीकडेच झालेल्या कराटे परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.
या यशामुळे महेश दादा स्पोर्ट फाउंडेशनचा अभिमान अधिक वाढला आहे. अनेक वर्षांच्या कठोर मेहनती, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि चिकाटीच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल फाउंडेशनचे प्रशिक्षक श्री. गणेश लांडगे सर, शाळेचे सर्व शिक्षकवर्ग तसेच पालकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही यश मिळवावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. या तिन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने महिला पदाधिकार्याला जीवे मारण्याची धमकी




