Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने महिला पदाधिकार्‍याला जीवे मारण्याची धमकी

पिंपरी | भाजपच्या प्रदेश महिला पदाधिकार्‍याला टोळक्याने भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने जीवे मारण्याची धमकी दिली. महिला पदाधिकारी तक्रार देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यात गेली असता पोलीस ठाण्याबाहेर काही महिलांनी घेराव घालून तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. मात्र, एवढा गंभीर प्रकार घडूनही चिंचवड पोलीसांनी युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा विरोधात कोणताही गुन्हा दाखल केला नाही. केवळ मारहाण करणार्‍या दोन महिलांसह सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तेजस्विनी चंद्रकांत कदम (वय ३६, रा. गोकुळ स्विट शेजारी, निगडी, प्राधिकरण) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिता कृष्णा तिपाले, एकविरा शरीफ खान, प्रविण यादव, आशिष राऊत, गोरव गोळे, सागर घोरपडे, जयेश मोरे अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तेजस्विनी या भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नावाने आरोपींनी तेजस्विनी कदम यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली असतानाही चिंचवड पोलीसांनी अनुप मोरे यांच्याविरूद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा     :        ‘आमदार महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे ‘ट्रेनिंग कॅम्प 2025’ उत्साहात पार!

२६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास तेजस्विनी या आशीष गावडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्यांना भेटून त्या निघाल्या असता बंगल्याबाहेर आरोपींनी त्यांना उद्देशून आमचा दादा अनुप मोरे येथे असताना तु येथे का आली, आम्ही तुला मारुन टाकू. तु येथून निघून जा, तु घरी एकटी राहतेस, अनुप मोरेने तुला मारुन टाकायाला सांगितले आहे. तुला अपघातात गाडीने उडवू. तुला बदनाम करून तुझे जगणे मुश्किल करुन टाकू, अनुप मोरे हा आमचा बाप आहे, तो आम्हाला सांभाळून घेईल, असे म्हणत दमदाटी केली. त्यामुळे भितीपोटी तेजस्विनी या परत आशिष यांच्या बंगल्यात गेल्या.

त्यांना सोडण्यासाठी आशिष हे कार घेवून सोबत आले असता गाडीस अचानक अनेक महिलांनी घेराव घातला. त्यामुळे तेजस्विनी या कार घेऊन चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरीता गेल्या. यावेळी आरोपी अनीता तिपाले व तिच्या सोबत असलेली एकविरा खान यानी तेजस्विनी यांना मारहाण व शिवीगाळ केली.

पोलीस ठाण्यात तक्रार देऊन त्या बाहेर आल्या असता सुमारे १०० जणांच्या टोळक्याने अनुप मोरे यांचे नाव घेत तुला मारुन टाकू, अशी धमकी दिली. फौजदार सुजाता पाटील तपास करीत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group