“भगिनींचे रक्षण करण्यासाठी छट मातेने मला शक्ती द्यावी”; आमदार महेश लांडगे
श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे छट पूजेचे आयोजन

पिंपरी | “छट माता तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, अशी मी प्रार्थना करतो आणि सर्व भगिनींचे रक्षण करण्यासाठी छट मातेने मला शक्ती द्यावी,” असे आमदार महेश लांडगे म्हणाले. श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे छट पूजेचे आयोजन संस्थापक डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर सोमवारी छटपूजा श्री सूर्यषष्ठी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पारंपरिक पद्धतीने महंत श्री राजुदास महाराज यांच्या हस्ते इंद्रायणी मातेचे पूजन करण्यात आले. यानंतर गंगा आरती करण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, माजी महापौर राहुल जाधव, आयोजक डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग साने, सुधीर काळजे, निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, विकास पाटील, प्रमोद गुप्ता, श्याम गुप्ता, दीपक चव्हाण, विजय पाटील, संदीप साकोरे व छटपूजा निमित्त आलेले भक्त भाविक उपस्थित होते.
हेही वाचा : एस. पी. जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची कराटेत चमकदार कामगिरी
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले की, छट माता तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, अशी मी प्रार्थना करतो आणि सर्व हिंदू भगिनींचे रक्षण करण्यासाठी छट मातेने मला शक्ती द्यावी असे आशीर्वाद मागतो.
विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर म्हणाले की, या सूर्यषष्ठी महोत्सवात छट मातेचे व्रत केले जाते. निसर्गात आणि समाजात एकरूपता यावी. सर्वांचे कल्याण व्हावे, पिक पाणी मुबलक यावे, यासाठी सूर्याला अर्ध्य देऊन त्याची उपासना केली जाते. सनातन धर्मात नदीला मातेचा दर्जा आहे. या महोत्सवात मातेचे पूजन करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश जगभर दिला जातो.




