आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

भारताचे एकमेव रेल्वे स्थानक, चारही दिशांना जाणाऱ्या ट्रेन पकडता येतात ‘मथुरा जंक्शन’

भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगात चौथ्या क्रमाकांवर

मुंबई : भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगात चौथ्या क्रमाकांवर आहे. रेल्वेने प्रवास केल्याने वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते. आरामदायी आणि किफायती प्रवास करण्यासाठी भारताचे लोक रेल्वेचा आधार घेतात. भारतीय रेल्वेत रोज १३,००० हजाराहून अधिक ट्रेनचे संचलन करते. भारतात जवळपास ३८,००० किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक आहे.

भारताचे एकमेव स्टेशन
तुम्हाला भारताचे एकमेव स्टेशन जेथून देशाच्या कानाकोपऱ्यात ट्रेन जातात असे स्थानक माहिती आहे का ? हे रेल्वेचे सर्वाधिक व्यस्त स्थानक म्हणूनही ओळखले जाते. या स्थानकात तुम्हाला २४ तास गंतव्य स्थानकात जाणाऱ्या ट्रेन मिळतात. आता तुम्हा हे रेल्वे स्थानक नवी दिल्ली वाटत असेल पण ते हे स्थानक निश्चितच नाही.

मथुरा जंक्शनवर एकूण 10 प्लॅटफॉर्म
भारताचे एकमेव रेल्वे स्थानक जेथे चारही दिशांना जाणाऱ्या ट्रेन पकडता येतात त्या स्थानकाचे नाव मथुरा जंक्शन असे आहे. हे मथुरा जंक्शन उत्तर मध्य रेल्वेच्या झोनमध्ये येथे. जे देशातील सर्वात मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी एक मानले जाते. येथे तुम्हाला प्रत्येक रुटसाठी दिवसाच्या २४ तास ट्रेन मिळतील. मथुरा जंक्शनवर एकूण दहा रेल्वे फलाट आहेत.

हेही वाचा –  महापालिका उभारणार पाच काेटींची ‘क्लायम्बिंग वॉल’

197 ट्रेनचा थांबा
रेल इंफ्राच्या माहितीनुसार मथुरा जंक्शनवर एकूण १९७ ट्रेनचा थांबा आहे. ज्यात राजधानी, शताब्दी, दुरंतो, सुपरफास्ट, एक्सप्रेस, मेल सह मेमू आणि डेमू ट्रेनचा समावेश आहे. तर १३ ट्रेन येथून विविध दिशांना आपला प्रवास सुरु करतात. या स्थानकाची निर्मिती झाल्यानंतर १८७५ मध्ये मंथुरा स्थानकातून पहिली ट्रेन सुरु झाली. हे एक धार्मिक स्थळ आहे. यास भगवान श्रीकृष्णाची नगरी देखील म्हणतात. होळी आणि जन्माष्टमीच्या दिवशी येथे खुप गर्दी असते.भारतीय रेल्वे मथुरा जंक्शनच्या मार्गाने जाणाऱ्या ट्रेनचे संचलन करते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button