गरीब हिंदूंना बाटवून ५०० कोटी, कमावणाऱ्या छांगुरबाबाचा दरबार!
उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात अटक करण्यात आलेल्या जलालुद्दीन ऊर्फ छांगुरबाबा यांच्या एक-एक लीला आणि कारनामे आता चव्हाट्यावर येऊ लागले असून नागरिकही चवीने चर्चा करत आहेत.
नराधमाचा उच्छाद, धर्मांतर रॅकेट..
हा नराधम त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर रॅकेट चालवत होता.विशेष म्हणजे या भोंदूबाबाला येथील हिंदूंचे मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यासाठी नेपाळमार्गे मुस्लिम राष्ट्रांकडून गेल्या काही वर्षात ५०० कोटी पेक्षा जास्त रुपयांची मदत मिळाली. असे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसी खाक्या, पोपटासारखा बोलू लागला !
या नराधम भोंदूबाबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हा भोंदूबाबा या परिसरात धर्मांतराचे रॅकेट चालवून गोरगरीब हिंदू हेरून हिंदूंना मुस्लिम बनवत होता आणि त्याने या पाचशे कोटीपैकी सर्वाधिक रक्कम अयोध्येत खर्च केली अशीही माहिती मिळाली आहे. हे प्रकरण नक्कीच अत्यंत गंभीर आहे असेच म्हणावे लागेल.
स्वातंत्र्य काळातील परिस्थिती..
ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी देशात हिंदू आणि मुस्लिम दोघेही राहात होते. त्यावेळी फाळणी झाली आणि हिंदूंसाठी भारत आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान अशी विभागणीही झाली होती. मात्र, बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मुस्लिम भारतात राहिले आणि त्यांनी पुन्हा हळूहळू येथे आपला जम बसवण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने, तत्कालीन काँग्रेस सरकारचे लांगूलचालनाचे धोरण असल्यामुळे मुस्लिमांना अवास्तव सवलती देखील दिल्या गेल्या. इतर धर्मियांना एक पत्नी हयात असताना दुसरे लग्न करण्याची बंदी आली. तसेच तीनच्यावर मुलेही नसावीत असेही नियम आले. मात्र मुस्लिमांना त्यातून सूट दिली गेली. परिणामी मुस्लिमांची लोकसंख्या वाढतच गेली, हे आपण पहात आहोत आणि तीच भारताची डोकेदुखी ठरू लागली आहे.
हेही वाचा – शुभांशू शुक्ला आज पृथ्वीवर परतणार, भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण; जाणून घ्या..
हिंदूंभोवती जाळे टाकले…
भारतातील मुस्लिमांनी येथील आदिवासी भागातील हिंदूंना बाटवणे आणि त्यांनाही मुस्लिम बनवणे सुरू केले. त्यांचा उद्देश हाच होता, की हळूहळू भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या वाढवायची आणि एकूण लोकसंख्येच्या ५० टक्क्यांच्या आसपास लोकसंख्या गेली, की भारतालाही मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित करायचे. असा प्रकार युरोपमध्ये काही देशात मुस्लिमांनी केलेला आहे. तसाच भारतातही करायचा,असा त्यांचा डाव असल्याचे बोलले जाते. दुर्दैवाने २०१४ पूर्वीची जी सरकारे होती, त्यांचे मुस्लिमांबाबत बोटचेपे धोरण राहिले. त्यामुळे त्यांचे फावत गेले. भरीस भर हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना मुस्लिम बनवणे, हा ‘लव्ह जिहाद’ चा प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू झाला. आजही तो सुरूच आहे!
धर्मांतराचे मोठे रॅकेट…
सध्या उघडकीस आलेल्या प्रकरणातील हा छांगुलबाबा आणि त्याचे धर्मांतराचे रॅकेट हा देखील असाच काहीसा प्रकार आहे. तो गेल्या पंधरा वर्षांपासून हा हिंदूंना आर्थिक प्रलोभने दाखवून आणि धाकधपटशा करून मुस्लिम बनवण्याचा गोरखधंदा करत असून आजपर्यंत असे प्रकार फारसे कोणाच्या लक्षात का येऊ नये ? हा देखील प्रश्नच आहे. या काळात त्याने कितीतरी हिंदूंना अशा प्रकारे बाटवून मुस्लिम बनवले असेल, याचा नेमका आकडा देखील पुढे यायला हवा.
धर्मांतर रोखणे आवश्यक..
आपल्या देशात विश्व हिंदू परिषद आणि तत्सम हिंदुत्ववादी संघटना अशा मूळच्या हिंदू असलेल्या बाटलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. आपल्या देशात आज मुस्लिमांनी तलवारीच्या जोरावर लोकांना बाटवले तर ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी खोटी प्रलोभने दाखवून हिंदूंना बाटवले. आजही ती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याला कुठेतरी अटकाव होणे गरजेचे झाले आहे.
त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घ्या..
त्याचप्रमाणे हे असे नव्यानेच बाटलेले जे हिंदू आहेत, ते आणि ज्यांचा चार-पाच पिढ्यांचा इतिहास ज्ञात आहे, असे मूळचे असलेले आणि बाटलेले परधर्मीय आहेत,त्यांना समजावून, त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना हिंदू धर्मात परत आणणे गरजेचे आहे. त्यांचा इतिहास ज्ञात असल्यामुळे ते पूर्वी ज्या जातीत आणि ज्या परिवारात असतील त्याच परिवारात ते परत सामावले जाऊ शकतात, हे लक्षात घ्यायला हवे! यासाठी समाजाचेही मतपरिवर्तन करावे लागेल. त्यासाठी देखील हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करायला हवेत.
सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र अडचणीत
आज भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. येथे हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध, पारशी जैन असे सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहतात. सध्या देशाचे जे संविधान आहे, ते या सर्वांना सामावून घेत समान वागणूक देणारे संविधान आहे. मात्र, जर येथील मुस्लिम लोकसंख्या ५० टक्क्यांच्या वर गेली, तर हे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा आग्रह होईल आणि तसे झाले तर तेथील कायदे येथे लागू होतील. ते आपल्या आणि पुढच्या पिढ्यांच्याही दृष्टीने हिताचे नसेल, हे मात्र निश्चित !





