Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय! स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांबाबत नवीन आदेश जारी

BIS Guidelines | गृहिणींच्या स्वयंपाकघरासंदर्भात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी सरकारने भारतीय मानक ब्युरो (BIS) मार्गदर्शक तत्त्वे अनिवार्य केली असून भांड्यांची सुरक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने (BIS) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

या आदेशानुसार स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमभांड्यांना राष्ट्रीय दर्जाच्या मानकांशी सुसंगत असणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी १४ मार्च रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या DPIIT ने गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी केला ज्यामध्ये या स्वयंपाकघरातील भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य करण्यात आला.

हेही वाचा    –      ‘सामना अजून संपलेला नाही, कोण कोणाची विकेट घेतं हे निवडणुकीत कळेल’; ठाकरे गटाचे मुख्यमंत्री शिंदेंना प्रत्युत्तर 

बीआयएसद्वारे ISI मार्क जारी केला जातो ज्याचा उद्देश उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आहे. बीआयएसनुसार आता सरकारच्या आदेशानंतर BIS मानक चिन्ह नसलेल्या कोणत्याही स्टेनलेस स्टील किंवा ॲल्युमिनियम भांडीच्या उत्पादन, आयात, विक्री, वितरण, स्टोरेज किंवा विक्रीवर व्हर्च्युअल बंदी घातली गेली असून वितरण, स्टोरेज किंवा विक्री या सर्वांवर बंदी असेल. त्याचवेळी, नियमाचे पालन न केल्यास दंडही आकारण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button