लेखकच आपल्या देशाचे कल्याण करतील; शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी

पुणे | देशामध्ये प्रचंड समस्या आहेत, त्या प्रत्येकाला भेडसावत आहेत, परंतु यामध्ये एक आशेचा किरण म्हणजे लेखक आहे, लेखकच आपल्या देशाचे कल्याण करतील यात शंका नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा केली कि देश विश्वगुरू होणार आहे. त्यातील एक छोटेसे पाऊल महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे ( महाराष्ट्र ) टाकत आहे, असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी केले.
महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने धायरी येथील धारेश्वर कला व क्रीडा संकुलाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य प्रा. सू. द. वैद्य, उद्घाटक राजेशजी पांडे (विश्वस्त सदस्य, नॅशनल बुक ट्रस्ट दिल्ली), महाकवी कालिदास संस्थेचे संस्थपाक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते, उपाध्यक्ष डॉ. महेंद्र ठाकूरदास, कार्याध्यक्ष काकासाहेब चव्हाण, अनिकेत चव्हाण तसेच प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : #UNCLOGHinjawadiITPark | ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!
यावेळी प्रा. डॉ. शुभांगी भडभडे, नागपूर, डॉ. व्यंकटसाई चलसानी, डॉ. आर. एस. झुंजारराव, कविवर्य जयंत भिडे, चंद्रकांत शहासने, रविंद्र शिवदे, पंडित संजय गरूड आदींना मान्यवरांच्या हस्ते पुणेरी पगडी, मानपत्र, स्मृतिचिन्ह व महाकवी कालिदास प्रतिष्ठानचा ४२५ पेजेसचा प्रातिधिनिक काव्यसंग्रह आणि महाकवी कालिदास जीवन गौरव तसेच कालिदास लक्षवेधी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच यावेळी महाकवी कालिदास प्रातिनिधिक काव्यसंग्रह आणि सुख हे फुलपाखरा परी डॉ. राजेंद्र पडतुरे यांची दोन पुस्तके, चंद्रकांत भालेराव व आदींच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
राजेश पांडे म्हणाले, महाकवी कालिदास प्रतिष्ठान लेखकांच्या माध्यमातून समाजात चांगले विचार पोहचविण्याचे कार्य करत आहे. त्यामुळे येणारी पिढी सक्षम होण्यास मदत होत आहे. पुणे शहराला जगाची पुस्तकांची राजधानी करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही लवकरच करू असे आश्वासन पांडे यांनी दिले.
कवी कालिदास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वि. ग. सातपुते ( भावकवी ) म्हणाले, महाकवी कालिदास प्रतिष्ठान देशभरातील सर्व कवी आणि लेखकांना एकत्र आणण्याचे काम सातत्याने करत असून आजपर्यंत संस्थेतर्फे आज पर्यंत ७० पुस्तके प्रकाशित केले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋचा कर्वे यांनी केले. आभार यशवंत देव यांनी व्यक्त केले.