पुण्यात भीषण अपघात, टेम्पो दरीत कोसळला; ७ महिला भाविकांचा मृत्यू, २२ जखमी

पुणे | खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिव मंदिराकडे दर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला, तर २२ महिला जखमी झाल्या आहेत. ही दुर्घटना आज सकाळी घाट परिसरात घडली.
पापळवाडी येथील काही महिला कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना त्यांची गाडी घाटातून प्रवास करत असताना नियंत्रण सुटून दरीत पलटी झाली. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य जखमी महिलांना तातडीने पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा : अरबी समुद्रात लष्करी हालचाली वाढल्या : भारत-पाकचा मोठा निर्णय : काहीतरी भयंकर घडत आहे?
खेड पोलीस स्टेशनकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याची खराब अवस्था आणि वाहनचालकाचे नियंत्रण सुटणे यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.





