Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘डंके की चोटवर मी तुम्हाला सांगतो..’; रामदास आठवलेंचं मोठं विधान

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, प्राथमिक मतमोजणीत राज्यात महायुतीने १४५ जागांवर आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देत निकालाच्या आधीच मोठं विधान केलं आहे. डंके की चोटवर मी तुम्हाला सांगतो की राज्यात महायुतीचं सरकार येईल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

रामदास आठवले म्हणाले, की आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुती आघाडीवर आहे. डंके की चोट वर मी तुम्हाला सांगतो की राज्यात महायुतीचं सरकार येईल. मागील काही निवडणुकीत मतदानाचा जेवढा टक्का होता. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. यामध्ये महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा मतदानाला मोठा उत्साह पाहायला मिळाला.

हेही वाचा       –      IND vs AUS | ऑस्ट्रेलिया संघ १०४ वर ऑल आऊट, बुमराहच्या ५ विकेट्स

https://x.com/PTI_News/status/1860154815327928383

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं १० वर्षातील काम चांगलं आहे. त्यामुळे लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे महाविकास आघाडीला असं वाटत होतं की ते सत्तेत येतील. मात्र, महाविकास आघाडीच्या स्वप्नांचा चक्काचूर होणार आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button