भारतीयांचा सर्वाधिक खर्च कशावर?
औषध आणि दारू या दोन गोष्टींवर भारतीयांच्या खर्चात 12 वर्षांपासून सातत्यानं वाढ

राष्ट्रीय : भारतीयांचा सर्वाधिक खर्च कशावर होतो? याचं उत्तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आर्थिक वर्ष 2024 मध्ये औषधी आणि दारू या दोन गोष्टींवर भारतीय कुटुंबांनी सर्वाधिक खर्च केल्याचं समोर आलं आहे. सरकारी आकड्यांनुसार औषध आणि दारू या दोन गोष्टींवर होणारा भारतीयांचा खर्च गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं वाढतच गेला आहे. दारू आणि तंबाखू या दोन गोष्टींवरील खर्च 2024 मध्ये 15.7 टक्क्यांनी वाढला आहे. 2012 पासून दारू आणि औषधांसाठी लागणाऱ्या खर्चात सातत्यानं वाढच होत असल्याचं समोर आलं आहे.
फक्त दारूच नाही तर गेल्या आर्थिक वर्षामध्ये भारतीयांनी औषधांवर आणि इतर आरोग्य साधनांवर देखील मोठा खर्च केल्याचं आकडेवारीमधून समोर आलं आहे, गेल्या बारा वर्षांमध्ये या दोन गोष्टींवर जेवढा खर्च झाला नव्हता तेवढा खर्च गेल्या वर्षी या दोन गोष्टींवर झाला आहे. गेल्या वर्षी औषध आणि दारूवरील खर्चामध्ये तब्बल 15.7 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर त्या आधीच्या आर्थिक वर्षात ही वाढ 7.2 टक्के एवढी होती.
हेही वाचा : पालखी मार्गावरील अडथळे दूर करा; पुणे महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय कुटुंबांनी गेल्या आर्थिक वर्षांमध्ये आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचं समोर आलं आहे, ज्यामध्ये डॉक्टर विविध प्रकारच्या गोळ्या औषधी आणि इतर आरोग्याशी निगडीत सुविधांचा समावेश आहे. तसेच दारूवर देखील मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे, या दोन गोष्टींचा देशाच्या जीडीपीमध्ये देखील मोठा वाटा आहे.
2012 पासून ते 2025 पर्यंत दर वर्षी या दोन गोष्टींवर होणाऱ्या खर्चामध्ये सरासरी 0.5 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. 2024 मध्ये कपडे आणि बूट, चपला यांच्या खरेदीचं प्रमाण घटलं आहे, त्यांच्यावर होणारा खर्च कमी झाला आहे. मात्र दुसरीकडे दारूवर होणाऱ्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच गेल्यावर्षी भारतीयांनी हॉटलिंगवर देखील मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचं समोर आलं आहे. दारू आणि आरोग्य या दोन गोष्टींवर गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं खर्च वाढत असल्याचं आकडेवारीमधून समोर आलं आहे.