ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

मालेगावला साठ हजार कुत्ता गोळी जप्त

४ लाख ५ हजार रुपये किमतीच्या ४ हजार गोळ्यांचे पत्ते जप्त

मालेगाव : येथील पवारवाडी भागातील ओवाडी नाल्याच्या पुलाखाली कुत्तागोळी घेऊन येणाऱ्याला पवारवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ४ लाख ५ हजार रुपये किमतीच्या ४ हजार गोळ्यांचे पत्ते जप्त केले. त्याच्यावर पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तो अटकेत आहे.

येथील मोहम्मद अय्याज निसार अहमद अन्सारी (वय ४८, रा. निजामपूर भिवंडी, हल्ली रा. अकरा हजार कॉलनी) हा मालेगाव शहरात कुत्ता गोळी विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पवारवाडी पोलिसांना मिळाली.

हेही वाचा  :  प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर; राज्यात ९१.८८ टक्के निकाल 

पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद अय्याजला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता बॅगेत ४ लाख रुपये किमतीच्या ६० हजार कुत्ता गोळ्या मिळून आल्या. पोलिसांनी त्याच्याकडून ४ लाख ५ ५०० रुपया ऐवज जप्त केला. मोहम्मद अय्याजने एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्फा झोलम गोळ्या कोठून आणल्या व तो विक्रीसाठी कोठे घेऊन जात होता याचा तपास पोलिस करीत आहेत. यामागे मोठे सूत्रधार पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शनिवारी (ता. ३) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ओवाडी नाल्याच्या पुलाखाली हा प्रकार घडला. पोलिस हवालदार राकेश उबाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button