Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown | लॉकडाऊनमध्ये विदर्भात लोहमार्गावर एकही गुन्हा नाही

वर्धा | कोरोनाची साखळी तोडण्याकरिता देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यात रेल्वेची चाकंही थांबली. रेल्वेची चाकं थांबली तेव्हापासून लोहमार्ग पोलिसांच्या स्टेशन डायरीचे एक पानही पलटलेले नाही, अशी माहिती समोर येत आहे. रेल्वेप्रमाणे रेल्वे पोलिसांची स्टेशन डायरीही लॉक झाल्याचे दिसत आहे. नागपूर विभागात या दिवसात रेल्वे लोहमार्ग पोलिसांत एकही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, गोंदिया, इतवारी, बडनेरा आणि अकोला या पोलीस स्टेशनचा समावेश आहे.

वर्दळीच्या रेल्वे प्रवासात नेहमी गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असते, लॉकडाऊनच्या काळात हे गुन्हेच लॉक झाले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button