Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; ८० कोटी लोकांना होणार फायदा

जर तुम्ही रेशन कार्डधारक आहात तर तुमच्यासाठी एक दिलासादायक वृत्त आहे. केंद्र सरकारनं रेशनकार्डसंबंधी एका नियमात बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. रेशन कार्डाला आधार कार्डाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आता सप्टेंबरपर्यंत रेशन कार्डाला आधार कार्ड जोण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. सोमवारी सरकारनं यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. तसंच आधार कार्ड जोडलं नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याचंही सरकारनं सांगितलं. रेशन कार्डाला आधार कार्ड न जोडल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येण्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना सरकारनं ही माहिती दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button