Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान’; नितेश राणेंच्या विधानामुळे वादाची शक्यता

Nitesh Rane | महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तिथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मंत्री नितेश राणे म्हणाले, की केरळ हे मिनी पाकिस्तान आहे. त्यामुळेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची बहीण तिथून निवडून येते. सगळे दहशतवादी त्यांना मतदान करतात. दहशतवादी लोकांना हाताशी धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत.

हेही वाचा     –      सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची मोशी येथील वसतिगृहाला भेट

अफजल खान वधाचा पोस्टर तुम्ही लावू नका, यातून भावना दुखवतील असा स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं. पण ज्या देशात ८५ टक्के हिंदू राहतात. आमच्या नसानसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. असं असताना मग त्या महाराष्ट्रात त्या देशात आम्ही अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावायचे नाहीत? मग पाकिस्तान मध्ये लावणार का? चार-दोन टकल्यांच्या भावना दुखवणार असतील तर मग त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश येथे जाऊन दाडी कुरवाळावी, असंही नितेश राणे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button