ताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोलकाताचा दृष्टिहीन असिफ इक्बाल टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी

पूर्ण मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवणार

कोलकाता : कोलकाता इथे राहाणारा दृष्टिहीन असिफ इक्बाल टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी होणार आहे. यावेळी तो पूर्ण मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवणार आहे. २०२३ व २०२४ मध्ये तो अर्ध मॅरेथॉन धावला होता. पण तो त्याच्या दोन मित्र धावपटूंसोबत त्याची पहिली पूर्ण मॅरेथॉन धावणार आहे, ज्यामध्ये ते त्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात मदत करतील. संपूर्ण मॅरेथॉन ८:१५ वेगाने धावून ५ तास ५० मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण करण्याचे त्याचे लक्ष्य आहे.

“माझ्यासाठी, मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नाही. तर, स्वतःला आणि जगाला दाखवून देण्याची ही एक संधी आहे की आपल्याला वाटत असलेल्या मर्यादा फक्त आपल्या मनात आहेत.” असिफ म्हणाला.

त्याच्या प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तंत्रज्ञानाचा लाभ घेणे. तो एक घड्याळ वापरतो जो त्याचा वेग, सरासरी वेळ आणि अंतरावर रिअल-टाईम ऑडिओ अपडेट देतो. दरम्यान, त्याच्या मित्र धावपटूच्या कमरेला जोडलेल्या वायरलेस स्पीकरमधून सतत गाणे वाजत राहाते, ज्यामुळे त्याला सोबतच्या धावपटूंची नेमकी स्थिती कळते.

त्याचे प्रशिक्षण सखोल आहे. तो आठवड्यातून तीन वेळा धावतो, त्याच्या प्रशिक्षकाने ठरवलेल्या काटेकोर वेळापत्रकानुसार, आणि त्याचा मित्र धावपटू सुमित दाससोबत दर रविवारी सराव करतो. अलीकडेच आसिफने त्याचा पहिला पूर्ण मॅरेथॉन सराव पूर्ण केला. असिफचा सात वर्षांचा हा प्रवास आहे, जो सातत्यपूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने तो करत आहे.

“मी यासाठी अनेक वर्षे घालवली आहेत. हे केवळ शर्यतीबद्दल नाही. तर, इथपर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेल्या वचनबद्धतेबद्दल आणि सातत्याबद्दल आहे. जर मी लक्ष केंद्रित केले आणि तयार असेन, तर मला माहित आहे की मी माझे ध्येय साध्य करू शकतो,” असिफ पुढे म्हणाला.

गेल्या वर्षी त्याने मुंबईमध्ये २ तास ४८ मिनिटांत अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली आणि कोलकाता येथे TSW 25K मॅरेथॉन त्याने ३ तास १५ मिनिटांत पूर्ण केली. आगामी टाटा मुंबई मॅरेथॉन ही एक विशेष आवृत्ती असणार आहे, आशियातील या सर्वात मोठ्या मॅरेथॉनला २० गौरवशाली वर्षे पूर्ण होत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button