पडळकरांचं वय नाही तेवढं पवारसाहेबांचं काम : रोहित पवार
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. गोपीचंद पडळकर यांची टीका ही खालच्या पातळीवरील राजकारण आहे. यामुळे दुःख होतं आणि चीड देखील येते. शरद पवार यांच्या कामाचा जितका अनुभव आहे, तितकं टीका करणाऱ्यांचं वयही नाही, असा सणसणीत टोला रोहित पवार यांनी लगावला. यावेळी त्यांनी इतरही राजकीय स्थितीवर भाष्य केलं. ते एका मराठी वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, गोपीचंद पडळकर जे बोलले ते राजकीय वक्त्व्य होतं. त्यांना ज्यांनी आमदार बनवलं त्या भाजपच्या नेत्यानेच पडळकरांना हे चुकीचं असल्याचं सांगितलं. त्यांच्याच नेत्याला हे वक्तव्य चुकीचं वाटलं. त्यांच्याच नेत्याने ते चुकले हे दाखवून दिलं. म्हणूनच आम्ही वेगळं बोलून काय करणार आहोत. शरद पवार मागील 50-55 वर्षांपासून लोकांसाठी काम करत आहेत. ते लोकांच्या मनात आहेत. त्यामुळे ज्या लोकांना काही काम नाही तेच शरद पवार यांच्या बदनामीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार यांचं जितकं वर्ष काम आहे इतकं याचं वयही नाही.”





