राजकारणी मुस्लिमांपुढे कुत्र्यांसारख्या..; कालीचरण महाराजांचे वादग्रस्त भाष्य

Kalicharan Maharaj | कालीपुत्र कालीचरण महाराज हे त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त हिंदुत्ववादी वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही नंदुरबार येथे आयोजित हिंदू धर्मसभेत त्यांनी मतदानाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भाषणादरम्यान बोलताना त्यांची जीभ घसरली असून त्यांनी राजकीय नेत्यांबाबत तसेच हिंदू समाजाच्या मतदान पद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
हिंदू जनजागृती सभेच्या वतीने नंदुरबार येथे हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आयोजक डॉ. नरेंद्र पाटील यांच्यासह विविध संत-महात्मे उपस्थित होते. यावेळी कालीपुत्र कालीचरण महाराजांनी राजकारण, धर्म आणि मतदान या विषयांवर भाष्य करताना वादग्रस्त विधानं केली.
हेही वाचा : मुंबईत कोणालाही महापौर बसवणं सोपं नाही; खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले?
राजनीतीची हवा जेव्हा लोकांचा डोक्यात जाते तेव्हा धर्म विसरतो. म्हणून राजनीती डोक्यातून काढून धर्मा, देशासाठी जो काम करेल त्याला सत्तेत बसवा. धर्म फक्त सनातन हिंदू धर्मच आहे ज्यातून ईश्वरचा साक्षात्कार होतो. तोच खरा धर्म आहे. धर्मज्ञानाची वृद्धी करून वोटर बँक बना. कट्टर हिंदू लोकांना सत्तेत पाठवा राजनीतीची हिंदूकरण करणे याशिवाय पर्याय नाही. आपण हिंदू 45 टक्के वोट करतो तर मुस्लिम समाज हा धर्मासाठी 100 % वोट करतात.
आपण सडका जातीवाद डाळ तांदूळ याच्यासाठी वोट करतो धर्मासाठी नाही. त्यामुळे हे सर्व डोक्यातून काढून धर्मासाठी एकजुटीने मतदान करा. व जो हिंदू धर्म साठी, हिंदू रक्षणासाठी काम करेल त्याला सत्तेत पाठवा. आपण सर्व एक हिंदू वॉटर बँक बनली तर सत्तेत बसल्यांनाही आपले काम करावे लागणार आणि हे सर्व आपल्या हातात आहे. यासाठी हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी केले.




