भारत-ब्रिटन व्यापार करार अंतिम टप्प्यात; पुढील आठवड्यात होणार औपचारिक घोषणा

नवी दिल्ली :भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करारासाठी रस्सीखेच चालू असतानाच भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापार करारासंदर्भात झालेली चर्चा समाधानकारक पद्धतीने समाप्त झाली आहे. औपचारिक कराराची घोषणा पुढील आठवड्यात केली जाणार आहे. या करारामुळे भारत आणि ब्रिटन दरम्यानचा व्यापार वाढेल. त्याचबरोबर दोन्ही देश परस्परांच्या देशात गुंतवणूक करू शकतील.
वाणिज्य मंत्रालयातील अधिकार्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितली की, ब्रिटन बरोबर अनेक महिन्यापासून चर्चा चालू होती. ती चर्चा आता समाप्त झाली आहे. ब्रिटनबरोबर व्यापार करार झाल्यानंतर युरोपातील इतर देशाबरोबरही असा व्यापार करार करण्याची शक्यता खुली झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युरोपातील अनेक देशाबरोबर भारताने अगोदरच व्यापार करार केलेला आहे.
कराराबाबतचा तपशील देताना अधिकार्यांनी सांगितले की, जास्त मनुष्यबळाकडून तयार केलेल्या भारतातील वस्तूवर ब्रिटन कर लावणार नाही. त्यामध्ये पादत्राणे, कपडे इत्यादीचा समावेश आहे. त्या बदल्यात भारत ब्रिटनमधून येणार्या व्हिस्की आणि वाहनावरील कर कमी करणार आहे.
हेही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांना लेटमार्कपासून मोठा दिलासा; अर्धा तास उशिरा ड्युटीवर हजर राहण्याची मुभा
दोन्ही देशातील व्यापार वाढविण्यासाठी याची मदत होणार आहे. भारत आणि ब्रिटनने करार करताना 2030 पर्यंत दोन्ही देशातील व्यापार वाढवून 120 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. या व्यापार करारामुळे हे उद्दिष्ट सहज पूर्ण होऊ शकेल याची खात्री आहे. असे अधिकार्यांनी नमूद केले.
कराराचा मसुदा तयार
कराचा कराराचा मसुदा तयार झालेला आहे. तो भारत सरकार व ब्रिटन सरकारकडून मंजूर केला जाईल. त्यानंतर या कराराची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू होणार आहे. या करारामुळे दोन्ही देश परस्परांच्या देशात गुंतवणूक करू शकणार आहेत. त्यामुळे दोन्ही देशात रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होऊ शकणार आहे.





