यंदा वडाच्या पूजेसाठी अभिजित मुहूर्त चुकवू नका; पहा वट पौर्णिमेची सर्व माहिती

Vat Purnima | जून महिना उजाडला की सुवासिनी महिलांना वट पौर्णिमा सणाचे वेध लागतात. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. वट पौर्णिमा हा विवाहित स्त्रियांचा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात. वट पौर्णिमेची माहिती, वडाला पूजण्याचा मुहूर्त आणि शुभ योग पाहुया.
वटवृक्ष दीर्घायुषी असतो आणि त्याची मुळे खोलवर पसरलेली असतात, ती एका मजबूत कुटुंबाचे प्रतीक मानली जाते. तसेच, वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांचा वास असतो, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे.
हेही वाचा : पशुधन वाचवण्यासाठी लम्पी रोग प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण
वट पौर्णिमा 2025 तिथी – द्रिक पंचांगानुसार, वट पौर्णिमेसाठी आवश्यक असलेली ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी 10 जून रोजी सकाळी 11:35 वाजल्यापासून सुरू होत आहे आणि ती 11 जून रोजी दुपारी 1:13 वाजेपर्यंत वैध असेल. दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजे अभिजीत मुहूर्त सकाळी 11:53 ते दुपारी 12:49 पर्यंत आहे. अभिजीत मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करणे सौभाग्यदायी मानले जाते.