Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा पक्षाला रामराम

मुंबई : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. सुरेखा पुणेकर यांनी हैदराबादच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

सुरेखा पुणेकर यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्या मोहोळ किंवा देगूलूर या दोन मतदारसंघातून बीआरएसच्या तिकीटावर लढण्याती शक्यता आहे.

हेही वाचा – IND vs WI : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

Surekha Punekar join BRS :लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची राष्ट्रवादीला  सोडचिठ्ठी

सुरेखा पुणेकर यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण आता त्यांनी हैदराबाद येथील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button