#CoronaVirus: रशियाच्या कोरोनाच्या लसीच्या नावामागचे रहस्य नेमकी काय?

पुणे: कोरोनावर लस शोधून त्याचा प्रयोग करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. या लसीचा पहिला डोस राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीला देण्यात आलेला आहे. पुतीन यांच्या मुलीला दोन वेळा या लसीचा डोस देण्यात आलेला आहे. डोस दिल्यानंतर त्यांच्या शरीरातील तापमानात बदल झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. पुतीन यांच्यानुसार, पहिला डोस दिल्यावर त्यांच्या शरीरातील तापमान 38 अंश सेल्सिअस होतं. लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर तापमान 1 अंशाने आणखी घटलं होते. मात्र, काही वेळाने तापमान आणखी वाढलं आणि त्यानंतर हळूहळू तापमान सामान्य झालं आहे.
रशियाने या लसीचं नाव पहिला उपग्रह Sputnik V च्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे. याला 1957 मध्ये लाँन्च करण्यात आलेलं होतं. रशियाने दोन महिन्यांपूर्वी याबाबतचे संकेत दिलेले होते की त्यांची लस चाचणीमध्ये सर्वात पुढे आहे. मात्र, रशियाच्या या लसीवर अमेरिका आणि ब्रिटनला अद्यापही संशयच आहे. इतकंच नाही तर रशियावर लसीचा फॉर्म्युला चोरल्याचा आरोपही लावण्यात आलेला आहे.





