Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नाशिक जिल्ह्यात नव्याने पाच रूग्ण कोरोनाबाधित आढळले
नाशिक जिल्ह्यात नव्याने पाच रूग्ण करोनाबाधित आढळले आहेत. यातील एक नाशिक शहरातील निवारागृहातील युवक (मुंबईहून आलेला) आहे. उर्वरित चार मालेगाव येथील आहेत. यात तीन महिलांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. यामध्ये मालेगाव ४०, नाशिक ४ व इतर भागातील ३ अशी एकूण ४७ जणांची आकडेवारी आहे





