Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतला राज्यातील स्थितीचा आढावा 

हर्षवर्धन यांनी बुधवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकचे जिल्हाधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्र हे सर्वाधिक करोनाग्रस्त राज्य असून सरकारला सर्व प्रकारची मदत केंद्राकडून दिली जाईल, असे आश्वासन हर्षवर्धन यांनी दिले. मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यांकडे अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. गोंदिया आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये २८ दिवसांत नवा रुग्ण आढळलेला नाही. बीड जिल्ह्यात २१ दिवस, तर अहमदनगर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये ७ दिवसांमध्ये नवा रुग्ण आढळलेला नाही. गडचिरोली आणि वर्धा हे जिल्हे करोनामुक्त आहेत, अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button