Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

Chandrayaan-३ ने पाठवलं चंद्राचं पहिलं छायाचित्र, ISRO शेअर केला व्हिडीओ

Chandrayaan-३ : चंद्रयान ३ ची रविवारी रात्री ११ वाजता इस्त्रोने ‘ऑर्बिट रिडक्शन’ प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. यान चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. यानाने चंद्राचा पहिला फोटो आणि व्हिडीओ ISRO ला पाठवला आहे. हा व्हिडीओ ISRO ने ट्विटरवर शेअर केला आहे.

भारताच्या Chandrayaan-३ ने अखेर चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. बंगळुरु येथून इस्रोने दिलेल्या कमांडप्रमाणे Chandrayaan-३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे आणि चंद्राचे फोटो घेतले आहेत, जे ट्विटर पेजवरुन प्रसारित करण्यात आले आहेत. शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास Chandrayaan-३ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि ती यशस्वी झाल्याचं इस्रोने म्हटलं आहे. त्यामुळे आता Chandrayaan-३ चा चंद्राच्या भूमीवर लॅंड होण्याचा प्रवास सुरु झाला आहे.

हेही वाचा – जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा; संजय राऊत म्हणाले..

Chandrayaan-३ चंद्रावर उतरवण्यासाठी दोन महत्वाचे टप्पे राहणार आहे. हे टप्पे यशस्वी पार केल्यावर Chandrayaan-३ हे चंद्रावर उतरवता येणार आहे. १७ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळे होणार असून ते २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले जाणार आहे. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास अशी क्षमता असणारा भारत हा जगातील चौथा बनणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button