Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

पालकांसाठी आनंदाची बातमी! वह्या-पुस्तकांच्या किमतीत मोठी घट

राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला लवकरच सुरुवात होत असून, शाळा देखील सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार म्हटलं की, सर्वच पालकांची पाठ्यपुस्तके, वह्या आणि इतर शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होतो. यंदा सर्वच वह्या-पुस्तकांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे आता पालकांच्या खिशाला कात्री बसणार नाही.

गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाठ्यपुस्तक आणि वह्यांच्या किमतीमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी घट झालेली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजेच कागदाच्या किमती कमी झाल्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या आणि वह्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. तसेच गाईड्सच्या किमतीत देखील घट झाली आहे. पूर्वी नवनीत कंपनीची वही 60 रुपयाला यायची ती आता 55 रुपयाला येत आहे.

हेही वाचा   :    “हरित आर्थिक स्वायत्ततेकडे पाऊल – पिंपरी-चिंचवडचा देशात पहिला ‘ग्रीन बॉण्ड’” 

नवनीत प्रमाणे सर्वच कंपन्यांच्या वह्या स्वस्त झाल्या असून, 5 ते 7 रुपयांपर्यंत एका नगाच्या किमतीत फरक पडला आहे. वह्या-पुस्तकांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून, सर्व वह्या-पुस्तके खरेदी करता येणार आहेत. वह्या-पुस्तके वगळता इतर कुठल्याही शालेय साहित्याच्या किमतीत वाढ झालेली आहे किंवा त्याच्या किमती स्थिर आहेत. एक डझन वह्यांच्या मागे देखील 50 रुपयांचा फरक पडलेला आहे, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button