Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

Big news : दहशतवादाला सुरुंग, भारताच्या जाळ्यात तहव्वूर!

26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अखेर ताब्यात: तहव्वुर राणाला तिहार तुरुंगात ठेवण्याची तयारी

नवी दिल्ली ।: मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला तहव्वूर राणाला भारतात आणले जात आहे. अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय पथक अमेरिकेत दाखल झाले होते. भारतात आणल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी केली जाईल आणि नंतर त्याला न्यायालयात सादर केले जाईल.

पटियाला हाऊस कोर्टाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालय परिसरात सीआयएसएफसह निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

राणाला तिहार तुरुंगात ठेवले जाणार

तहव्वुर राणाला तिहार तुरुंग ठेवले जाणार आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, राणाला तुरुंगात उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. राणावर डेव्हिड कोलमन हेडली, लष्कर-ए-तैयबा (एलईटी), हरकत-उल-जिहादी इस्लामी (एचयूजी) आणि इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

विशेष एनआयए न्यायालयात खटला चालणार

दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. आता या प्रकरणाची सुनावणी दिल्लीत होणार असल्याने, राणाला मुंबईत पाठवले जाणार नाही. या हाय-प्रोफाइल प्रकरणात भारताच्या वतीने वरिष्ठ वकील दयान कृष्णन हे खटला चालवतील. त्यांच्यासोबत विशेष सरकारी वकील (एसपीपी) नरेंद्र मान हे कायदेशीर कार्यवाहीचे नेतृत्व करतील.

हेही वाचा –  बिहार निवडणुकीवेळी राणाला फाशी होईल; संजय राऊत यांचा दावा

पाकिस्तानने हात झटकले

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे पाकिस्तानने गुरुवारी स्पष्ट केले. पाकिस्तानने म्हटले की, तहव्वुर राणा हा कॅनेडियन नागरिक आहे. त्याने जवळजवळ दोन दशकांपासून त्याचे पाकिस्तानी कागदपत्रे अपडेट केलेली नाहीत.

कोण आहे तहव्वूर राणा?

तहव्वूर राणा हा पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक असून, त्याला अमेरिकेत बंदी घातलेल्या दहशतवादी संघटने लष्कर-ए-तैयबाचे काम केल्याबद्दल आणि २६ ते २९ नोव्हेंबर २००८ दरम्यान मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी लष्कर-ए-तैयबाला मदत केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान मुंबई दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दल, नागरिक आणि परदेशी पर्यटकांसह १७४ हून अधिक लोकांचा बळी गेला होता.

भाजपा- काँग्रेसमध्ये श्रेयवाद

मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर काँग्रेस आणि भाजपामध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. तहव्वूर राणाला भारतात आणल्याचे श्रेय घेतल्याबद्दल काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी मोदी सरकारवर टीका केली आणि म्हटले की, हे “यूपीए सरकारच्या काळात या प्रकरणी केलेल्या कामाचे परिणाम आहेत. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर बोलताना चिदंबरम म्हणाले की, “मी हे स्पष्ट करतो की, मोदी सरकारने ही प्रक्रिया सुरू केली नाही किंवा त्यांना यामध्ये कोणताही नवीन यश मिळाले नाही. त्यांना फक्त यूपीएच्या काळात सुरू झालेल्या परिपक्व, सातत्यपूर्ण आणि धोरणात्मक राजनैतिकतेचा फायदा झाला. हे प्रत्यार्पण कोणत्याही दिखाव्याचा परिणाम नाही, तर राजनैतिकता, कायदा अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रामाणिकपणे आणि कोणत्याही प्रकारे छाती न ठोकता केले तर भारतीय राज्य काय साध्य करू शकते याचा हा पुरावा आहे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button