Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

रम्मी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माणिकराव कोकाटेंना दणका!

मुंबई : महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत रम्मी खेळतानाचा व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “जे घडलं ते अतिशय चुकीचं आहे. विधान भवनामध्ये अशा प्रकारची गंभीर चर्चा सुरू असताना, आपलं काम नसलं तरी आपण गंभीर असणं आवश्यक आहे. साधारणपणे सभागृहात कामकाजाचे कागद वाचता, किंवा इतर काही वाचता तर ते ठीक आहे. पण रम्मी खेळणे हे काही बरोबर नाही. कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी काहीही सांगितलं तरी ते काही आमच्यासाठी भूषणावह नाही,” असे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कोकाटे यांच्या कृतीमुळे महायुती सरकारवर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, लातूरमध्ये छावा संघटनेने राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून निषेध व्यक्त केला. यानंतर मारहाणीची घटनाही घडली. तटकरे यांनी कोकाटे यांचं वागणं अयोग्य असल्याचं म्हटलं असून, कारवाईचा निर्णय अजित पवारांवर सोपवला आहे.

हेही वाचा –   दंड दुप्पट, परवाना रद्द आणि पुन्हा टेस्ट द्यावी लागणार ! वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नवे नियम

कोकाटे यांनी, “मी रम्मी खेळत नव्हतो, यूट्यूबवरील जाहिरात स्किप करत होतो,” असा खुलासा केला. मात्र, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवा व्हिडिओ शेअर करत कोकाटे ऑनलाइन जुगार खेळत असल्याचा दावा केला. शेतकऱ्यांच्या संकटकाळात कोकाटे यांच्या कृतीमुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले असून, अजित पवार कोकाटेंचा राजीनामा घेणार की त्यांची खुर्ची वाचवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button