होलिकोत्सवात खैरेंच्या नावाने नंदकुमार घोडेले यांनी ठोकली पहिली बोंब .
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-159.png)
औरंगाबाद | महाईन्यूज|
शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीसमोर सोमवारी पारंपरिक पद्धतीने होलिकात्सव साजरा करण्यात आला . गणपतीची आरती आणि पूजा झाल्याबरोबर पहिली बोंब शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याच नावाने ठोकण्यात आली. तीही महापौर नंदकुमार घोडेले यांनीच ठोकली. शिवसेनेचे बहुतांश नेते हजर असलेल्या या राजकीय होलिकोत्सवात कार्यकर्त्यांनीही अधिकच हक्काने आपल्या नेत्यांना ‘शिव्या’ची लाखोलीही वाहिली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Holi-696x364-1.jpg)
सोमवारी रात्री आठ वाजता या होलिकोत्सवास सुरुवात झाली. माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, यांच्यासह अनेक प्रमुखांची उपस्थिती होती. प्रत्यक्ष होळी पेटवण्यासाठी सर्व मान्यवर उठताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी ‘खैरे साहेबांच्या नावाने…’ अशी आरोळी देत बोंब ठोकली. याशिवाय आमदार अंबादास दानवे यांच्या नावानेही एकदा बोंब मारण्यात अली. सर्वाधिक बोंबा खैरेंच्याच नावाने ठोकण्यात आल्या.