सर व्ही. आर्थर लुईस यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या स्मरणार्थ गुगलचे खास डूडल
![Sir V. Google's special doodle commemorating the Arthur Lewis Nobel Prize](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/सर-व्ही-आर्थर-लुईस.jpg)
नवी दिल्ली – अर्थतज्ञ, प्रोफेसर आणि लेखक सर व्ही. आर्थर लुईस यांना 1979 साली आजच्याच दिवशी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार विकसनशील देशांच्या प्रगतीमध्ये इकॉनॉमिक फॉर्सेस या मॉडेलसाठी देण्यात आला होता. यानिमित्ताने आज गुगलकडून सर व्ही. आर्थर लुईस यांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे.
सर लुईस हे आधुनिक अर्थशास्त्राचे संस्थापक मानले जातात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते पहिले कृष्णवर्णीय फॅकल्टी होते. तसेच ब्रिटिश युनिव्हर्सिटीमध्ये मानाचं पद मिळवणारे आणि प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण वेळ प्रोफेसरशिप सांभाळणारे ते पहिले कृष्णवर्णीय होते.
सर व्ही. आर्थर लुईस यांचा जन्म 23 जानेवारी 1915 रोजी island of St Luciaमधील Caribbeanमध्ये झाला होता. त्यांचे दोन्ही आई-वडील दोघेही शिक्षक होते. ते Antiguaमधून स्थलांतरित झाले होते. वयाच्या १४व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून त्यांनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये क्लार्क म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1932मध्ये त्यांनी सरकारी शिष्यवृत्ती मिळवत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पुढील शिक्षण घेण्याचा निश्चय पक्का केला. वयाच्या 33व्या वर्षी वर्णभेदाचा सामना करत ते प्रोफेसर झाले. यामध्येदेखील त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. सर व्ही. आर्थर लुईस यांनी पुढे संयुक्त राष्ट्रासोबत काम केले. आफ्रिका, आशिया आणि Caribbeanच्या सरकारसोबत त्यांनी अनेक कामे केली. Caribbean Development Bankचे ते पहिले अध्यक्ष ठरले.